Summary of the Book
फ्रान्त्स काफ्का या जर्मन लेखकाचे साहित्य अनेक भाषांत भाषांतरित झाले आहे. काफ्काचे स्वतःच्या जीवनातील अनुभव त्याच्या साहित्यात दिसतात. कथा, दीर्घकथा, कादंबऱ्या, टीकात्मक लेखन, गद्य वेचे ही त्याची साहित्यसंपदा. आजही त्याचे लेखन मनाची पकड घेते. त्यातील जीवनसंघर्ष, जीवनानुभव यांच्याशी वाचकांचे नाते जुळते. अपराध, शरम, बदनामी या संकल्पनेभोवती काफ्काच्या कथा-कादंबऱ्या फिरतात. त्याच्या स्वतःच्या लेखनाविषयीचे लेखनही त्याने केले आहे. नीता बडवे यांनी त्याच्या कथा 'निवडक काफ्का'मधून मराठी वाचकांपर्यंत पोचविल्या आहेत. मूळ जर्मन भाषेतील या कथा मराठी वाचकांनाही भावतात, आपल्या वाटतात.