Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
ऋग्वेद आणि उपनिषदे आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. ऋग्वेद हा जगातील प्राचीन आणि आद्य ग्रंथ म्हणून, तर देशोपनिषदे ही हिंदूधर्म तत्वज्ञानाचा पाया म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, सामान्यांना त्याविषयी फारशी माहिती नसते. रघुनाथ जोशी यांनी अभ्यास करून या ग्रंथाचा अर्थ वाचकांसमोर ठेवला आहे. ऋग्वेदाचा अल्प परिचय, अपौरुषेय वेद, ऋग्वेदाचा अर्थ करावा कि नाही, माझा ऋग्वेदाचा अभ्यास या प्रकरणांतून लेखकाने विस्ताराने परिचय करून दिला आहे. उपनिषदे ही धर्मापेक्षा सृष्टीविज्ञानाशी संबंधित आहेत. असा निष्कर्ष ते काढतात. परीशिष्टांमधील 'ऋग्वेदातील उपमा आणि अन्य भाषालंकार' हे वैशिष्ट्यपूर्ण झाले आहे..
हल्ली भारतीय परंपरेतील ग्रंथांवर, किंबहुना भारतीय परंपरांवर टीका करण्याचे एक प्रकारचे fad निघाले आहे काय असे हे पुस्तक वाचून वाटले. निश्चितपणे लेखकाचा अभ्यास बराच दिसतो. कारण लेखकाने अभ्यास कसा केला त्याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आहे. परंतु श्रद्धा ही एक अशी गोष्ट आहे की जी धर्मासारखीच समाजाला उपयोगी ठरणारी आहे. तर अशा श्रद्धेवर अस घाव घालणे हेच या लेखकाचे उद्दिष्ट असल्याचे दिसते. हे पुस्तक वाचून फार धक्का बसला कारण ऋग्वेद आणि उपनिषदांचा संबंधी बरेच वाचन मीही केलेले आहे. वाचकांनी ठरवावे या पुस्तकाबद्दल काय मत द्यावे. एकंदरीत, चार्वाक मंडळींच्या पठडीतील हे पुस्तक दिसून येते.
Kaustubh Khandekar
30/09/2015
Excellent book that throws very good light on the contents of Rigveda. How Rigveda is hardly sacred and contains the picture of the then civilization and society rituals. How cow is not holy and how Rigved is dictated by humans and not god.
A must book to be kept in home liabrary.