Summary of the Book
श्री. अरुण साधू या अग्रेसर कादंबरीकाराचा हा पहिलाच कथासंग्रह.
याआधी ‘मुंबई, दिनांक...’, ‘सिंहासन’, ‘बहिष्कृत’, ‘शापित’, इत्यादी एकापाठोपाठ एक सरस अशा कादंबर्या लिहून त्यांनी कादंबरीकार म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
श्री. साधूंची कथा कधी व्यक्तीच्या अंतरंगाचा, मानवी मनाचा सूक्ष्मातिसूक्ष्म स्तर उकलून दाखवते, कधी भिन्न भिन्न व्यक्तींच्या परस्परांतील संबंधांचा वेध ती घेते, कधी माणसाच्या मनातील संघर्षाचा, द्वंद्वाचा, मूलभूत प्रवृत्तींचा शोध ती घेते, कधी जीवनाचा एखादा छोटासा तुकडा घेऊन त्याचा अनेकांगी विविध स्तरीय शोध घेते.
श्री. साधूंच्या चित्रदर्शी लेखन-शैलीमुळे त्यांची प्रत्येक कथा ही स्वतंत्र चित्रवाण ठरते; आणि ते जसे थोर कादंबरीकार आहेत, तसे श्रेष्ठ कथालेखकही आहेत, असे आश्वासनही देते.