Hard Copy Price:
10% OFF R 250R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
अशोक सोकाजी इंगळेला वाटलं, हा आपला अजब सत्याग्रह आहे. फुल्यांनंतर शंभर वर्षांनी, आंबेडकरांची लढाई सुरू झाल्यावर पंचाहत्तर वर्षांनी आणि स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांनी आपल्याला हे सोंग करावं लागतं आहे. ही अजब गोष्ट आहे. स्वतंत्र भारताच्या हे साठ कोटी नागरिकांनो, हे सत्याग्रह ही आपल्या देशाच्या अत्यंत शरमेची गोष्ट आहे. तेव्हा फक्त लज्जेनं मान खाली घाला. कारण आम्ही सत्याग्रह करतो आहोत, ते पाण्यासाठी. आम्हांला माणून म्हणून वागवा, असे आमचे म्हणणे नाही. आमचे म्हणणे एवढेच, की निदान आम्हांला तुमच्या जनावरांएवढे तरी हक्क द्या, तुमच्याबरोबर पाणी पिण्याचे. आणि, हे मनू, या देशातल्या सतरा कोटी मानवांच्या माणूसपणावर खिळा ठोकणाऱ्या महापंडिता, तुलाही नमस्कार असो. तू मरून दोन-तीन-चार हजार वर्षे झाली असतील. पण तुझे भूत अजून मानगुटीवर आहे. तुझे समंध गाडून टाकण्यासाठीच हा केविलवाणा प्रयत्न आहे. ते गाडले जाणार नाही एवढ्या लवकर, याची कल्पना आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे....?