तळागाळातील सामाजिक व्यथा , जातीयवाद आणि त्यातून निर्माण होणारा साहित्यिक विद्रोह नामदेव ढसाळांनी मुख्य प्रवाहाच्या समाजा पर्यंत पोहचवण्यासाठी केलेला संघर्ष इथे त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला अनुभवायला मिळतो , हा कविता संग्रह म्हणजे प्रस्थापित समाजासाठी एक चपराक आहे.