Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले.
ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं!
देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्हातर्हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!
Pu La ni aamch jivan samruddha kelay. Pu lanchi itarahi pustake tevdhich vachniy aahet. 1943 chya Abhiruchi masikatil Pu Lancha "Anna Vadgaokar" ha lekh vachayla milala asta tar khup chhan zale aste. Konakade asel tar krupaya uplabdha hoeel ka?
Dhanyavad
Gaurav
01 Jan 2019 05 30 AM
One of the finest works!
Abhijeet Pawar
11 Sep 2014 05 30 AM
5
chaitrali joshi
07 May 2014 05 30 AM
nice book
Sandesh
02 May 2013 05 30 AM
This is definitely one of the greatest marathi book....All stories have some funny part associated but in the end of every story it will bring tears in your eyes...too good....This book will inspire me to become a very good human being in life...Thanks Pu.la
Sarvesh Shailesh Natu
16/09/2012
this is the best book forever
Shailesh Kalamkar
22/06/2012
या पुस्तकातील बर्याचश्या कथा मी ४-५ वेळा वाचून काढल्या आहेत. ऑफिस मधून घरी आलो कि शीण कमी करायचा असेल तर हे पुस्तक हातात घ्यायचं आणि एकटाच हसतोय म्हणून जगासाठी वेड ठरायच , मनमुराद आन्दाचा ठेवा ओळीओळीतून उचलायचा.अप्रतिम आणि उच्च दर्जाचे लेखन.
Girish
06 Apr 2012 05 30 AM
No Words for P.L.Deshpande books ....all are awesome....
PRASAD SOMWANSHI
06 Jun 2011 05 30 AM
पुस्तकचे वर्णन करायला शब्द नाहीत. ........पुलचे पुस्तकं रेटिंग देण्याच्याही पलीकडे असतात. ५ स्तर रेटिंग फार कमी आहे ह्या पुस्तकाला.
विजय कारंजेकर
01 Apr 2011 05 30 AM
अतिशय सुंदर पुस्तक. समजा मला एख्यादा निर्जन बेटावर राहावे लागणार आहे, आणि मला फक्त एकच पुस्तक सोबत नेता येणार अशी अट आहे तर कोणते पुस्तक निवडावे असा प्रश्न पडला तर मी तत्काळ एकही क्षण न दवडता , व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकाची निवड करीन. मी असंख्य वेळा हे पुस्तक वाचलेले आहे. कोणतेही पान उघडावे आणि कोठूनही सुरुवात करावी आणि नंतर मग वेळेचे भान राहत नाही. पुलंनी निर्माण केलेली हि पत्रे खरोखर अजरामर झाली आहे. हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हवे.