Summary of the Book
लेखक अभ्यासक राजू परुळेकर यांनी टीव्ही वाहिन्यांसाठी आणि मुद्रित माध्यमांसाठी घेतलेल्या अनेक मुलाखती गाजल्या. या मुलाखतींच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील थोर व्यक्तींशी संवाद साधण्याची, त्यांना मनमोकळेपणाने बोलते करण्याची संधी त्यांना मिळाली. 'मुलाखत घेणं हि एक कला आहे. ते शास्त्र, तंत्र किंवा मंत्र अजिबात नाही,' असे ठामपणे सांगणाऱ्या परुळेकरांनी या संधीचे अक्षरशः सोने केले.
म्हणूनच त्यांनी घेतलेल्या मुलखती पुस्तकरुपात वाचताना संस्मरणीय वाटतात. विजय तेंडूलकर, शरद जोशी, गिरीश कार्नाड, सोनिया, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र कोल्हे अशा रथी-महारथींशी झालेल्या गप्पा पुस्तकात वाचायला मिळतात. परुळेकर यांची मुलाखतही पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.