Summary of the Book
हिंदीसह अन्य भाषांमधील चित्रपटांनी भारतीयांचे कलाजीवन समृद्ध केले आहे. मात्र, चित्रपटांना समृद्ध कोणी केले, असा प्रश्न केला, तर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतील ते दिग्दर्शक. दिग्दर्शक हे चित्रपटांचा आत्मा असतात. विजय पाडळकर यांनी या दिग्दर्शकांपैकी ५० निवडक दिग्दर्शकांच्या कार्यावर, कर्तुत्वावर, स्वप्नांवर, स्वप्नपुर्तीवर आणि कल्पनांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.
चार्ली चॅप्लीन हे अभिनेते म्हणून माहित असतील, मात्र त्यांच्यातील दिग्दर्शकाची कसब पुस्तकातून समजते. दादासाहेब फाळके, वॉल्ट डिस्ने, जॉन फोर्ड, रॉबरर्टो रोसेलिनी, सिटीझन केन, आल्फ्रेड हीचकॉक, सत्यजित राय, चारुलता, बिमल रॉय, अकिरा कुरोसावा, ऋत्विक घटक, मृणाल सेन, आदी दिग्दर्शकांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख होते.