Summary of the Book
आयुष्यात स्थिरस्थावर होणे हे माणसाचे ध्येय असते. पण अशा अनेकांना स्थिर होण्यास मदत होती तो बेलदार समाज मात्र आजही भटकाच राहिला आहे. दुसऱ्यांची घरे बांधणाऱ्या समाजाच्या माणसांचे हलाखीचे जीवन अशोक पवार यांनी 'इळनमाळ'मधून मांडले आहे. ना गाव, ना घर, ना संस्कृती ना शिक्षण, ना मतदानाचा अधिकार, ना कोणते हक्क, ना अधिकार अशा नकारात्मक गोष्टींनी ग्रासलेला हा समाज कोणत्याही गुन्ह्यात पोलिसांचे सावज बनत असतो. या समाजात जन्म घेऊन सर्व अनुभव घेतल्याने या आत्मकथानात्मक कादंबरीला एक वेगळीच धार आहे. यातील क्लेश, दुःख, पीडा, संताप व खेद या भावना वाचकही शब्दांतून अनुभवतो.