Summary of the Book
भारतीय चित्रपटसृष्टीचे आकर्षण सर्व जगाला आहे. बॉलीवूडचे चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, गायक यांच्याविषयी कौतुक असते. पूर्वीचे चित्रपट आशयसंपन्न, अर्थपूर्ण गाणी व अभिनयाने परिपूर्ण असत, असे सांगितले जाते. म्हणूनच अश्या विविध भाषांतील चित्रपटांचे विश्लेषण अशोक राणे यांनी 'मोंताज'मध्ये केले आहे.
'मोंताज' म्हणजे एडिटिंग; पण हे केवळ तांत्रिक एडिटिंग नसून समोर दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या गोष्टींतून अर्थनिष्पत्ती जाणवून देणे किंवा सूचन करणे, अशी सोपी व्याख्या राणे यांनी सांगितली आहे. त्यानुसार 'श्री ४२०' 'सीमा', 'प्यासा', 'अपूर संसार', 'अनाडी', 'कागज के फुल', 'मुगल - ए - आझम', 'मेघे ढाका तारा', 'ड्युएल', 'दूर का राही', 'अनुभव',
'स्वयंवरम', 'गमन', 'शक्ती', 'बॅलड ऑफ नारायामा', 'कोकटेबल, 'द पेशन्स स्टोन' अशा १९५५ ते २०१३ या काळातील भारतीयच नाही, तर विदेशी चित्रपटांचे प्रसंग सांगून त्यातील वेगळेपण, दृश्याची, संवादाची, संकलनाची, संगीताची परिणामकता कशी जाणवते हे विशद केले आहे. ते वाचताना चित्रपटांचे विविध पैलू समजू लागतात. चित्रपट पाहण्याची नजर मिळते.