Summary of the Book
भटक्या जमातीतील वडार जमातीचा जीवनसंघर्ष, त्यांची जगण्याची पद्धत, शिक्षण घेताना पावलोपावली परिस्थितीशी करावी लागलेली तडजोड आणि शेवटी उच्चशिक्षण घेऊनही पदरी पडलेली बेरोजगारी हे त्याच्या जीवनातील वास्तव मांडणारी ‘पडझड’ ही कादंबरी मानवी मनाला सुन्न करणारी आहे.
ज्या व्यवस्थेत स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते, त्या वडार समाजातील स्त्रीच्या देहाच्या कशा चिंधडया उडतात, याचे रेखाटन वाचकाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मानवी जीवनातील वास्तविकता मांडणारा कांदबरीकार म्हणून अशोक पवारांची नोंद घेणे गरजेचे आहे.