Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
सदर लेखात पु. ल.नी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आपल्या अजोड विडंबनशैलीत कथन केले आहे.
पुलंनी पुस्तकावर केलेली विडंबनात्मक प्रस्तावना:
साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली. आमचे उथळ लिखाण आम्ही उथळ आहे हे सांगून दिले होते. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणे उथळ लिहिण्यालाही खळ्खळाट फार. इतक्या इमानाने सांगूनही अंखड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखी खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित(१), आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुध्द बरळू लागले. नशीब, विषयच सोडला. कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचे कळले होते. हे सारे ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी ‘मी’पणा जाऊन ‘आम्ही; पणा(२) आला. "खोली वाढवली पाहिजे", "खोली वाढवली पाहिजे" म्हणू लागलो. आमचे एक मित्र म्हणाले, त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक घ्या." त्यांचा वाङ्मयाशी संबंध नाही. नुसतेच वाचक आहेत. त्यांना वाङ्मयीन खोली कशी असते ठाऊक नाही. शेवटी ‘वाङ्मयाचा इतिहास’ लिहिण्याखेरीज गत्यंतर नाही हे उमगले.
मुकुंदराजाचा विवेकसिंधु, परमामृत, पवनविजय, मूलस्तंभ वगैरे न वाचल्याचे हे परिणाम आहेत हे ध्यानी आले. पहिला सोडून बाकीचे तीन हे वैद्यकीय ग्रंथ आहेत अशी आमची समजूत होती. आणि पहिला ग्रंथ नसून आयुर्वेद रसशाळेने बनविलेले औषध आहे असे मानीत होतो. आम्ही मुकुंदराज वाचला नाही, लोलिंबराज ठाऊक नाही, चांगदेवपासष्टी, ज्ञानेश्वरी(पसायदान तेवढे सभासंमेलनात ऐकून होतो), लल्ल कवीचा ‘रत्नकोश’, मोगलिपुत्त तिष्य (हा ग्रंथ की ग्रंथकार हे अजूनही ठाऊक नाही. सॉरी!), भोजलिंगाचे ‘महात्मसार’,मन्मथस्वामीचे ‘मन्मथबोधामृत’,म्हाइंभट्टाचा ‘पद्य खरडा’ (हा आदेश नसून ग्रंथ आहे), असले ग्रंथ आपण वाचले नाहीत ह्याचे परमदु:ख झाले. आणि अभ्यासासाठी म्हणून पूर्वसूरींचे आणि चालू सूरींचे ग्रंथ मागवले. चार-चार पाचपाच किलो वजनाचा तो एकेक ग्रंथ पाहून थक्क झालो आणि वाचू लागल्यावर एक जुने विनोदी व्यंगचित्र आठवले. (विनोदाशी हा शेवटला संबंध. यापुढे तलाक तलाक तलाक.)
मी आठवीला असताना पुलंचं पहिलं पुस्तक वाचलं आणि there was no going back. लायब्ररीत पुलंची जेवढी पुस्तकं होती ती सगळी घरी आणून त्याचा फडशा पाडला. त्यात हे पुस्तक मात्र नव्हतं. या पुस्तकाबद्दल फारशी चर्चाही होताना दिसत नाही.
पुस्तक वाचून झाल्यावर त्याचं कारण मात्र समजत नाही. त्यांच्या इतर सगळ्या पुस्तकांपप्रमाणे हेही तितकेच दर्जेदार आहे.
•
कै विनायक लक्षण भावे यांचे 'महाराष्ट्र सारस्वत' या पुस्तकाचे हे विडंबन आहे. मराठी वांङ्मयाची आठ शतकं या पुस्तकात विस्तारित पद्धतीने अभ्यासली आहेत.महाराष्ट्र सारस्वत आणी गाळीव इतिहास या दोन्ही पुस्तकांची अनुक्रमणिका सारखीच आहे. भावेंचे अभ्यासपूर्ण लेखन आणि पुलंची विडंबन ह्या साहित्यप्रकारावर असलेली पकड या दोन्हीही गोष्टी वाखाण्यासारख्या!
आपल्या मराठीला समृद्ध बनवण्यात दोघांचाही तितकाच हात.
•
पुलंची विडंबनशैली आणि इतकं समृद्ध मूळ पुस्तक यामुळे गाळीव इतिहासाला मात्र बहर आलेला दिसतो. पुलंच्या खुमासदार कोट्या आणि तत्कालीन इतिहासकारांची उडवलेली खिल्ली यामुळे लोटपोट होईपर्यंत हसू येते.
या पुस्तकातल्या तळटीपा तर माझ्या विशेष आवडीच्या.
वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेले व्यंगचित्र आणि एकंदरीतच पुस्तकात काढलेली चित्रं ही अशक्य आहेत. काही काही ठिकाणी तर पुलंएवढंच सरवटेंचं कौतुक करावसं वाटतं!
•
या पुस्तकातला माझा एक आवडता उतारा :
रामदास समर्थ
रामनवमीचे दिवशी 'टळटळीत दुपारीं' रामाचा जन्म ज्या वेळी होतो त्या वेळी जन्म घेऊनसुद्धा ह्यांचे नाव रामचंद्र वगैरे ठेवावयाचे काही ह्यांचे तीर्थरूप सूर्याजीपंत ह्यांना सुचले नाही. नारायण हे आपले नाव त्यांना कधीच आवडले नाही. लग्नात नवरीमुलगी उखाण्यात हेच नाव घेणार हे लक्षात येऊन वेळीच सावधान होऊन भर मांडवातून पळाले. पण भर बोहोल्यावरून पळावयाला लागलेल्या नारायणामागून त्याला पकडण्या- साठी धावण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. कारण जांब हाय- स्कूलच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात पळण्याच्या शर्यतीत विद्यार्थी नारायण ठोसर याने सगळी बक्षिसे पटकाविली होती, हे त्यांना ठाऊक होते.
°
'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.
°
दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!
५/५ 🌟