Summary of the Book
निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आत्तापर्यंत काश्मीरसंदर्भात विविध ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. या पुस्तकात त्यांनी काश्मीरमधील पाकिस्तानपुरस्कृत घुसखोरांच्या कारवायांबद्दल तपशीलवारपणे लिहिलं आहे. दहशतवाद्यांशी लढण्यासाठी काय करावं लागेल, तसेच 370 कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या विकासावर होणारा परिणाम, याची माहिती त्यांनी दिली आहे. पाकिस्तानकडून गेल्या 30 वर्षांत इथं कशा कारवाया सुरू आहेत. अतिरेक्यांचे किती गट आहेत, याची माहिती देऊन महाजन त्याच्यावर ठोस तोडगाही सुचवतात.