नक्षल भागात स्वत: फिरून, जीव धोक्यात घालून लेखकाने फारच मेहनत घेतलेली दिसून येते. त्यातल्या काही कथा वाचताना अक्षरश: चटके बसतात. तर गावापर्यंत रस्ता आला म्हणून कोणीही खर तर खुश होईल. पण रस्ता आल्यानं आता पोलीस लवकर पोचतील' हे तिथल्या लोकांचे उद्गार वाचून आपलीच आपल्याला लाज वाटते. अशी सुन्न करणारी कादंबरी नक्कीच वाचावी.