Summary of the Book
पाश्चात्य संगीताच्या सुरांत रमणार्या, कुलाब्याच्या रस्त्यांवर वावरणार्या, जहांगीरच्या पायरीवर स्थिरावणार्या, फाईव्हस्टारच्या लॉन्सवर रंगणार्या, एक पाय सत्याच्या तळ्यात आणि दुसरा पाय स्वप्नांच्या मळ्यात ठेवून बिनधास्त, बेबंद जगण्याचा आव आणणार्या एका कोवळ्या, स्वप्नाळू, व्यवहारी पिढीची ही कहाणी. मुंबईच्या किनारयावर घडणारी.
किनार्यावरून दिसणार्या सागरासारखी. थिरकणारी, फेसाळणारी.
ज्याला सोबत यायचं असेल त्याला क्षितिजापर्यंत नेणारी. खोल मनाचा तळ सहज उलगडून दाखवणारी.
अनोळखी कहाणी. पण खरीखुरी...,