Summary of the Book
पोलीस चातुर्य कथा लिहिणारे लेखक म्हणून श्रीकांत सिनकर यांचा परिचय आहे. सिनकर यांचे जीवन उच्चभ्रू समाजातील असले तरी त्यांचा वावर पोलीस, गुन्हेगार, मटका, दारूअड्डे, वेश्या वस्ती येथे कायम असायचा. त्या ठिकाणी भेटलेल्या व मनात एक स्थान निर्माण केलेल्या व्यक्तींवर त्यांनी सैली १३ सप्टेंबर'मध्ये लिहिले आहे. नेपाली वैश्या असलेल्या सैलीची शरीरापलीकडील लागलेली ओढ, तिचे निरागस वागणे, तिचे जग, त्याअनुषंगाने येणारे अंडरवर्ल्ड दर्शन, तसेच उच्चशिक्षित पण वैश्यावृत्तीची जिन जिमलेट, न्यूयॉर्क कॉटनच्या मटक्यावरील जगन, हातभट्टीवाला दत्तू या जीवाभावाच्या माणसांविषयीच्या आठवणी, चित्रविचीत्र अनुभव वाचकांना एक नवे, चाकोरीबाहेरचे जग दाखवितात.