Summary of the Book
एक भावकवी आणि `मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खण्डकाव्याचे निर्माते म्हणून कृ. ब. निकुम्ब परिचित आहेत. `पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुम्बांना अचूक गवसली आहेत. मराठी समीक्षाविषयक लेखनात या संग्रहाची भर मोलाची ठरावी.